महाराष्ट्र हिमालयासारखा वाटतो: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh KoshyariSaam Tv
Published On

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी (Pm Narendra Modi) मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यपाल बोलताना, महाराष्ट्र मला हिमालया सारखा वाटतो असं म्हणाले. यावेळी महाराष्ट्रातील काही शहरात पाण्याची समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची विनंती राज्यपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी मदत केली, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. राजभवन हे फक्त राजभवन राहू नये हे 'लोकभवन' व्हावे असा माझा प्रयत्न आहे. राजभवन लोकोपयोग कसे होईल हे मी पाहिले. मी राज्यभर फिरलो. मला आता मराठी भाषा समजते.

Governor Bhagat Singh Koshyari
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार

मला लोक महाराष्ट्र कसा वाटतो विचारता, तेव्हा मी मला महाराष्ट्र हिमालयासारखा वाटतो, अस मी सांगतो. हिमालयात समुद्र नाही , पण महाराष्ट्रात हिमालय नाही, तरिही मला महाराष्ट्र हिमालयासारखा वाटतो. मी ज्यावेळी राज्यात फिरत असतो, असेच एकदा मी औरंगाबादमध्ये गेलो होतो त्यावेळी मला लोकांनी पाण्याची समस्या सांगितली. पंतप्रधानांना मी विनंती करतो पाण्याची समस्या सोडवा, अशी विनंतीही राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केली.

मी एका शेतकरी घरातील आहे, शेतकऱ्यांच्या काय समस्या असतात मला माहित आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्याची विनंतीही राज्यपाल यांनी राज्य सरकारला केली.

Governor Bhagat Singh Koshyari
Monsoon Updates : मान्सूनचे महाराष्ट्रात कधी होणार आगमन?; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

फडणवीसांचं भाषण; अजित पवारांना डावललं?

पुण्यातील देहू नगरीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) भाषण झालं. मात्र, या कार्यक्रमात पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचेही भाषण व्हायला हवे होते. मात्र, त्यांना डावललं गेल्याचा आरोप होत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. देहूतील कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

याबाबत विविध स्तरांतून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू न देणे हे जाणीवपूर्वक घडले आहे, असे दिसते. गेल्या वेळीही अजित पवार यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणून दिली होती. त्याचाच राग निघालेला यावेळी दिसून येतो, असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) ट्विटमधून म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com