Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Maharashtra FDA Action: प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे आणि खोकल्याच्या सिरपची विक्री करणाऱ्या ८८ मेडिकल शॉप मालकांवर महाराष्ट्र एफडीएने कारवाई केली आहे. इतर १०७ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी राज्यव्यापी तपासणी सुरू आहे.
Maharashtra FDA Action
Maharashtra FDA cracks down on 88 chemists for selling medicines without prescription; state-wide raids to protect public healthsaam tv
Published On
Summary
  • राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची मोठी कारवाई झाली.

  • ८८ औषध विक्रेत्यांना तत्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले गेले.

  • १०७ विक्रेत्यांना नोटिसा देण्यात आल्या.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

राज्यभरात बिना प्रिस्क्रिप्शन कफ सिरप आणि इतर वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने ८८ औषध विक्रेत्यांना औषध विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत.

एफडीएने या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्यांमधील औषध दुकाने तपासली. या तपासणीत नियमभंग केल्याचे आढळले. याप्रकरणी ८८औषध विक्रेत्यांना औषध विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १०७ विक्रेत्यांना त्यांच्या परवान्यांवर निलंबन किंवा रद्द करण्याची कार्यवाही का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे.

Maharashtra FDA Action
Maharashtra Cough Syrup Alert : FDA ची मोठी कारवाई, खोकल्यावरील औषधांचा मोठा साठा जप्त

एफडीएने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्री ही गंभीर गैरप्रकार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात अशी तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा एफडीएचा इशारा आहे.

Maharashtra FDA Action
Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

दरम्यान केंद्र सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्याच्या आरोग्य विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः दोन राज्यांमध्ये या पद्धतीने चुकीची औषधे झाली आणि त्याचा फटका बसला त्याबद्दल केंद्र सरकारने जे निर्देश दिले त्याची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली होती.

एफडीएत्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे, एखाद्या कंपनीच एखाद औषध चुकीचं असेल म्हणजे सर्व काही चुकीचं आहे असं नाही, स्पष्ट सूचना आल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे .

कप सिरपमुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील २० मुलांचा मृत्यू झाला होता. यातील ८५ टक्के मुले ५ वर्षापेक्षा कमी वरायचे होते. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी करावाई करत चेन्नईमध्ये श्रीसन मेडिकल्सचे मालक एस. रंगनाथन यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com