Missing Link Project : महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट! मुंबई- पुण्याला जोडणार तरंगणारा ब्रिज; या तारखेला सुरु होणार मिसिंग लिंक

Mumbai Pune Expressway Missing Link Project: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक सुरु होणार आहे. यामुळे मुंबई पुण्यातील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे.
Missing Link Project
Missing Link ProjectSaam Tv
Published On

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक हा महाराष्ट्रासाठीचा ड्रिम प्रोजेक्ट असणार आहे. हा मिसिंग लिंक महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग असणार आहे. सध्या या प्रकल्पावर काम सुरु आहे. हा प्रोजेक्ट हा खूप आगळा वेगळा असणार आहे. (Missing Link project)

मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिग लिंक प्रकल्पाअंतर्गत १८० मीटर उंचीचा केबल स्टेड पूल उभारला जात आहे. यामुळे मुंबई पुणे प्रवास अजूनच कमी वेळात होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी खंडाळा घाट लागणार नाही. या पुलाचे काम सध्या सुरु आहे. पावसाळ्यात या पुलाचे काम करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी महत्त्वाचा टप्पा पूर्ण करायचा आहे.

Missing Link Project
KDMC Ring Road: केडीएमसीच्या रिंगरोडचा मार्ग मोकळा; एकाच गावातील 113 घरांच्या पाडकामाला सुरुवात

मुंबई पुणे एक्सप्रेसवरील या मिसिंग लिंकमुळे अंतर ६ किलोमीटरनं कमी होणार आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीशिवाय थेट पुणे गाठता येणार आहे. सध्या लोणावळा घाटात खूप ट्राफिक होते. त्यामुळे या ट्राफिकमधूनही सुटका होणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची एमएसआरडीसीचे टार्गेट होते. मात्र, काही कारणांनी हा प्रोजेक्ट लांबला आहे.

या मिसिंग लिंक प्रोजेक्टअंतर्गत खोपोली एक्झिटपासूनते लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने ४ मार्गिंकासाठीचे दोन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यातील मोठा बोगदा ८.८७ किमीचा असणार आहे. तर दुसरा १.६७ किमीचा असणार आहे.या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

Missing Link Project
Amrit Bharat Express: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 50 अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या लवकरच होणार सुरू

या मिसिंग लिक प्रोजेक्टचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात या पूलाचे काम करणे अवघड आहे. त्यामुळे त्याआधी महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत या मिसिंग लिंकचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Missing Link Project
Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com