Municipal Election: मतदारांची नावे शोधण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून भाजपच्या अ‍ॅपचा वापर; मतदान केंद्रावरील गंभीर प्रकार

Kandivali Mumbai Municipal Elections: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कांदिवलीमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. येथे मतदारांची नावे शोधण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या अॅपचा वापर केला जातोय. यामुळे निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Kandivali Mumbai Municipal Elections:
Allegations surface at Kandivali polling booth as voter names were reportedly searched using a party app during municipal elections.saamtv
Published On
Summary
  • राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू

  • कांदिवलीतील मतदान केंद्रावर गंभीर प्रकार उघड

  • मतदारांची नावे शोधण्यासाठी पक्षाचे अ‍ॅप वापरल्याचा आरोप

संजय गडदे, साम प्रतिनिधी

राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली. मात्र बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे यांसह अनेक गैरप्रकार समोर आलेत. कांदिवलीमधील प्रभाग क्रमांक येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मतदारांची नावे शोधण्यासाठी थेट पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे अॅप वापरले जात असल्याचा प्रकार समोर आलाय.

मतदानावेळी गंभीर प्रकार उघडकीस येत असल्यानं विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जातेय. स्थानिक मतदान केंद्रावर थेट व्हिडिओ बनवून ते गैरप्रकार उघडकीस आणत आहेत. दरम्यान पुणे, सोलापूर, मुंबई आणि जालन्यासह काही ठिकाणी बोगस मतदार पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.तर कांदिवलीमधील प्रभाग क्रमांक २९ मध्ये निवडणूक अधिकारीच भाजपचे चिन्ह दाखवून मतदारांना भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Kandivali Mumbai Municipal Elections:
Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एका निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व तटस्थ असणे अपेक्षित असताना, एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अ‍ॅपचा वापर होत असल्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. कांदिवली येथील एका मतदान केंद्रावर नेमलेले निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अ‍ॅपचा वापर करत असल्याचा व्हिडिओ ठाकरे गट आणि मनसेचे उमेदवारानं शेअर केलाय.

या घटनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, या प्रकरणाची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या उमदेवारानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक निवडणूक अधिकारी महिलेचे नाव राऊत आहे.

Kandivali Mumbai Municipal Elections:
BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर

मुंबई महानगरपालिकेनं मतदारांची नावे शोधण्यासाठी जे अधिकारी नेमले आहेत, ते भाजपचा मोबाईल अॅप वापरत आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे मतदारांची नावे शोधण्यासाठी एक स्वतंत्र अॅप आहे. तरीही निवडणूक अधिकारी या भादपंच अॅप वापरत आहेत. हे अॅप वापरत असताना निवडणूक अधिकारी मतदारांना भाजपचे चिन्ह दाखवत आहेत. भाजपच्या उमेदवाराला मत देण्यास सांगत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उमेदवाराने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com