Nana Patole : मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही...; नाना पटोले सभागृहात आक्रमक, विधानसभेत काय घडलं?

Nana Patole Suspended From Maharashtra Assembly : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक रुप पाहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जिथे बसले होते तिथे ते धावून गेले.
Nana Patole Suspended From Maharashtra Assembly
Nana Patole Suspended From Maharashtra AssemblySaam Tv News
Published On

मुंबई : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक रुप पाहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जिथे बसले होते तिथे ते धावून गेले. 'या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे', असं नाना पटाले म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. 'तुमच्याकडून असं संसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही', असं राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांचं निलंबित केलं.

'जर भाजपचे आमदार आणि कृषीमंत्री मोदी शेतकऱ्यांचा बाप आहे असं बोलत असतील. मोदी यांचा बाप असू शकतो, पण शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. शेतकऱ्यांना अपमानित करण्यासाठी हे सत्तेत आहेत का? शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात म्हणून हे सत्तेत आहेत का? यापेक्षा असंवैधानिक काय असू शकतं' असा सवाल नाना पटोलेंनी केला. सभागृहातून निलंबन झाल्यानंतर ते बाहेर माध्यमांशी बोलत होते.

Nana Patole Suspended From Maharashtra Assembly
Kunal Patil Join BJP: धुळ्यात काँग्रेसला खिंडार; कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, नाना पटोले यांचं अध्यक्षांनी निलंबन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतली. विधानसभेत एकच गदारोळ झाल्यानंतर थोड्यावेळासाठी कामकाज स्थिगत करण्यात आले. नाना पटोलेंच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाच्या आवारात विरोधकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Nana Patole Suspended From Maharashtra Assembly
Nana Patole: '२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरायचे, फक्त २ बायका होत्या'; नाना पटोलेंची जीभ घसरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com