अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आलाय. मुख्यमंत्र्यांनी एका हॉटेलमध्ये थांबून अगदी साधेपणाने भेळ आणि मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला. मुख्यमंत्री शिंदे अचानक आल्यामुळे खेड शिवापूर येथील कैलास भेळ या हॉटेलमधील कर्मचारी अन् मालकही चकीत झाले. मुख्यमंत्री शिंदेंचे हॉटेलमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हॉटेल परिसरात याची चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल साताऱ्याला निघाले होते. सोमवारी आपले सर्व कार्यक्रम आटोपून मुंबईवरुन साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी पुण्याजवळ महामार्गावरच त्यांनी आपला ताफा थांबवला अन् एका हॉटेलवर भेट आणि मिसळवर ताव मारला. हॉटेलमधील कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांनतर चकीत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय साधेपणाने हॉटेलमध्ये मिसळ आणि भेळ खाण्याचा आस्वाद घेतला.
सोमवारी रात्री एकनाथ शिंदे अचानक हॉटेलमध्ये उपस्थित झाल्यानंतर सर्व स्टाफच चक्रावले. शेजारील बसलेल्या नागरिकांसोबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत युवा सेनेचे सचिव किरण साळीही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साधेपणा पाहून उपस्थित असणारे सर्वजण भारावून गेले. मुख्यमंत्र्यांन उपस्थित लोकांची गप्पा मारत मारत मिसळ भेळ खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर ते सातऱ्याला निघाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा याआधीही अनेकदा साधेपणा दिसून आला होता. लोकसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर गेले होते. कन्हेरी मठाला भेट दिल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत शिंदेंनी कोल्हापुरी भाजी भाकरीचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर व इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी उभे राहून, भाजी भाकरीचा आस्वाद घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.