शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; शपथविधीवरून दोन मतप्रवाह

शिंदे सरकारने कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २० जुलै रोजी मुंबईत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Devendra Fadanavis and eknath Shinde
Devendra Fadanavis and eknath Shinde saam tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाल्यानंतर दोघांनी राज्यातील कारभार सुरू केला आहे. त्यांनी कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २० जुलै रोजी मुंबईत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Cabinet Expansion News In Marathi )

Devendra Fadanavis and eknath Shinde
'जे लोक गेलेले आहेत, त्यांचा...'; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते जोमाने कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी नुकताच काल ठाकरे सरकारच्या औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा नामांतराच्या निर्णयात फेरबदल केला. या निर्णयावरून दोघांवर टीका देखील झाली. तर राज्यातील १२ कोटींच्या जनतेसाठी केवळ २ सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे, त्यावरूनही विरोधकांकडून टीका होत आहे.

याचदरम्यान, शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार हा २० जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मंत्र्यांच्या शपथविधीवरून शिंदे सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहे. काही होणाऱ्या मंत्र्यांनी राज्यातील पूरपरीस्थितीमुळे साधेपणानं राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी करण्याची मागणी आहे.

तर काही होणाऱ्या मंत्र्यांनी विधान भवनातील प्रांगणात मोठ्या दिमाखात शपथविधी करण्याची मागणी केली जात आहे.अशा दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत. राज्यात एकीकडे पूरपरिस्थिती असल्यामुळे शपथविधि थाटामाटात करणे योग्य आहे का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. तर पहिल्या टप्यात एकूण १२ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

Devendra Fadanavis and eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारचा पवारांना दणका; स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

असे होईल खाते वाटप

गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील. तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com