'जे लोक गेलेले आहेत, त्यांचा...'; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

दोन्ही गटांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपावरून पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धुसर आहे. याचदरम्यान, यावर आता शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheSaam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे पक्षापुढे मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. काही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, दोन्ही गटांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपावरून पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धुसर आहे. याचदरम्यान, यावर आता शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Political News In Marathi )

Neelam Gorhe
शिंदे-फडणवीस सरकारचा पवारांना दणका; स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे एका साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मुलांना साहित्य वाटपाचं काम शिवसेना (Shivsena) खूप आधीपासून करत आहे. हजारो मुलापर्यंत पोहोचण्याचं काम शिवसैनिक करत असतात. आम्ही आधीपासून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आलो आहोत.पण आता राजकारणाचा प्रांत वाढला आहे. कारण त्यात मोठे वादविवाद सुरू आहेत'.

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, 'मी भगवद्गीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे लोक गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. जे लोक आपल्या मधून काही कारणाने दूर गेले आहेत. त्यांचे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि आपल्या नदीचा परत प्रवाह होईल याची मला खात्री आहे'. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळावर भाष्य करताना गोऱ्हे म्हणाल्या,' जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्या सरकारला ज्यावेळी शक्य होईल त्यांनी तो करावा. पण यात कायदा नक्की काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असतं'.

Neelam Gorhe
सुरेश धस यांच्यामुळे १५०० कोटींच्या विकास कामांना ब्रेक; आमदार बाळासाहेब आजबेंचा आरोप

दरम्यान, गोऱ्हे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतरावर देखील भाष्य केलं.'नामांतरांसारखे विषय हे लोकांच्या मनात रुजलेले आहेत. त्यामुळे अशावेळी अल्पमत, बहुमताचा विचार करायचा नसतो', असे मत गोऱ्हे यांनी जिल्ह्याच्या नामकरणावर व्यक्त केलं. तर २७ जुलैला शिवसेना पक्षप्रपमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीची महारती आम्ही करणार, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com