MLA Balasaheb Ajbe, Suresh Dhas
MLA Balasaheb Ajbe, Suresh DhasSaam Tv

सुरेश धस यांच्यामुळे १५०० कोटींच्या विकास कामांना ब्रेक; आमदार बाळासाहेब आजबेंचा आरोप

कार्यकर्त्यांच्या नावावर देवस्थानाच्या जमिनी लाटल्या आहेत, असा गंभीर आरोप आमदार आजबे यांनी केला आहे.
Published on

बीड: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता बीडच्या (Beed) आष्टीमध्ये, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस यांच्यामध्ये विकास कामांवरून चांगलीच जुंपली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस हे आष्टी तालुक्यातील विकास कामांना लागलेली कीड असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर देवस्थानाच्या जमिनी लाटल्या आहेत, असा गंभीर आरोप करत आमदार आजबे यांनी आमदार धसांवर सडकून टीका केली. ते बीडच्या आष्टी येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 MLA Balasaheb Ajbe, Suresh Dhas
मोठी बातमी! शिंदेंना सोडा मी सगळा पक्ष घेऊन येतो; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकास कामांच्या स्थगितीवरून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. आमदार आजबे म्हणाले की, भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल ७० गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला आहे. कृष्णा- मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र आ.धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या कामासाठी १५०० कोटी रुपये उपसा जलसिंचन योजना मधून मंजूर झाले होते. मात्र सुरेश धस यांनी पत्र दिल्याने कामाला स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोपही केला.

 MLA Balasaheb Ajbe, Suresh Dhas
शिवसेनेला धक्का! खासदार भावना गवळींचे समर्थक शिंदे गटात सामील

मी आमदार होण्यापूर्वी या कामाला पर्यावरण विभागाची मान्यता नव्हती. मात्र आमदार झाल्यावर या कामाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळवली. ही योजना उजनी ते खुंटेफळ अशी पाणी योजना होती. केवळ श्रेय घेण्यासाठी आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या कामाला स्थगिती देण्यासाठी विनंती केली. मी त्यांना जाहीर आवाहन करतो केवळ विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी कामांमध्ये खोडा घालू नका, असंही आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले.

आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर देवस्थानाच्या जमिनी लाटल्या आहेत. ते तालुक्यातील विकास कामांमध्ये खोडा घालत आहेत. यामुळे आमदार सुरेश धस हे विकास कामांना लागलेली कीड आहे. असा घनाघात राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com