शिवसेनेला धक्का! खासदार भावना गवळींचे समर्थक शिंदे गटात सामील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले.
Uddhav thackeray News
Uddhav thackeray NewsSaam Tv
Published On

यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत (ShivSena) उभी फूट सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेनेतील नेत्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे. आता यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांनी शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेला खिंडार पडले आहे. बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

Uddhav thackeray News
शिवसेनेला मोठा धक्का! पालघर जिल्ह्यातील ५० नगरसेवक शिंदे गटात सामील

पालघर जिल्ह्यातील ५० नगरसेवक शिंदे गटात सामील

वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला (ShivSena) ठाणे आणि पालघर पट्ट्यात मोठा फटका बसला आहे.

काल समाविष्ट झालेल्या नगरसेवकांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेतील ५ नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायत समितीतील ५ नगरसेवकानी, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी ५ पालघर जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच या नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

Uddhav thackeray News
राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि...; दीपाली सय्यद यांचा पलटवार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सोबतच वसई तालुका आणि बाईसर मधील प्रमुख पदाधिकारी तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे आणि बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि वसई विरार मनपाचे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, पालघर जिल्हा परिषद कृषी सभापती सुशील चुरी यांनीही शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे.

यावेळी बोलताना शिंदे (Eknath Shinde) यांनी वसई विरार आणि पालघर पट्ट्यातील या नगरसेवकांना त्यांच्या विभागात काम करण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करू असेही त्यांना सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून इथे अनेक विकास प्रकल्प राबवण्याचे देखील जाहीर केले. त्यामुळे विकासाचा दृष्टीकोन ठेवून तुम्ही दिलेली साथ वाया जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com