राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि...; दीपाली सय्यद यांचा पलटवार

दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
Dipali Sayyed/Sanjay Raut
Dipali Sayyed/Sanjay RautSaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्याच येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केला होता. दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मी दोन्ही नेत्यांची भेट घेतल्यानंतर मला जे जाणवलं ते मी ट्विटमध्ये मांडलं. प्रत्येकाच्या मनात इगो मान-अपमान आहे. दुरावा दुर व्हावा, तुटलेल घर एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे.शिवसेना नेते संजय राऊत हे मोठे आहेत त्यांना बलण्याचा अधिकार. राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी. कारण, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. बाळासाहेबांची सेना एकत्र असावी, सेनेत दोन गट नकोत असं स्पष्ट मत सय्यद यांनी व्यक्त केलं आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

'येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल'. असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

Dipali Sayyed/Sanjay Raut
शिवसेनेचा शिंदे गटाला धक्का; यवतमाळ जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

विशेष बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे सांगत दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजप नेत्यांचे आभारही मानले आहेत.

दीपाली सय्यद यांनी आणखी एक सूचक ट्विट केलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये दीपाली सय्यद म्हणतात, 'लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com