शिवसेनेचा शिंदे गटाला धक्का; यवतमाळ जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

माजी आमदार मुनगिनवार यांची सहसंपर्क पदी निवड
Maharashtra Political crisis
Maharashtra Political crisisSAAM TV
Published On

संजय राठोड

यवतमाळ - शिवसेनेत (Shivsnea) उभी फुट पडल्यानंतर दररोज शिवसेनेला बंडखोर नेते मंडळी धक्के देत आहे. मात्र यवतमाळ (Yavtmal) जिल्ह्यातील खास करून बंडखोर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा, दिग्रस आणि नेर या तीन तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना बाजुला करून त्यांच्या जागी नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती शिवसेनेने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड ह्यांनी बंड करित शिंदे गटात सामील झाले.

हे देखील पाहा -

तद्नंतर खासदार भावना गवळींनी देखील बंड केलं.त्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसाआधी शिवसेना भवन मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला यात प्रामुख्याने जिल्ह्यातील सेनेचे पहिले आमदार श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगिनवार यांची सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्त करून आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळीना धक्का देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Political crisis
कोरोनाची चौथी लाट आली? देशात २४ तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या; ४९ मृत्यू

पालघर जिल्ह्यातील ५० नगरसेवक शिंदे गटात सामील

वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला ठाणे आणि पालघर पट्ट्यात मोठा फटका बसला आहे.

काल समाविष्ट झालेल्या नगरसेवकांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेतील ५ नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायत समितीतील ५ नगरसेवकानी, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी ५ पालघर जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच या नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com