Maharashtra Politics: शासन आपल्या दारी, घरोघरी गोळीबारी! विरोधक चक्क खेळण्यातल्या बंदूका घेऊन विधानभवनात पोहोचले; नेमकं काय घडलं?

Maharashtra Budget Session Live Updates 2024: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन केले.
Maharashtra Budget Session Live Updates 2024
Maharashtra Budget Session Live Updates 2024Saamtv

Maharashtra Budget Session 2024:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, दहिसरमधील आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने राज्याचे राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. याच घटनांवरुन सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पायऱ्यांवर आंदोलन केले. रोज नवीन गोळीबाराची प्रकरण, गुंडांना मिळणारा राजाश्रय हे महायुती सरकारच्या काळात आता नवीन नाही, असा आरोप करत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विशेष म्हणजे गेली ती शिवशाही, आली गुंडशाही, शासन आपल्या दारी, घरोघरी गोळीबारी.. अशा घोषणा देत हातात खोट्या बंदूक घेऊन राज्य सरकारचा निषेधही विरोधकांकडून करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Budget Session Live Updates 2024
Farmers Lal Vadal : लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम; आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार..

दरम्यान, आजच्या अधिवेशनात मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांच्या आंदोलनावरुन सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे यांनी केली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं म्हणत आशिष शेलार यांनी जरांगेंची थेट एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा केली. (Latest Marathi News)

Maharashtra Budget Session Live Updates 2024
LokSabha Election 2024 : शांतीगिरी महाराज पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; नाशिकमध्ये स्वतः उमेदवारी केली जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com