Rohit Pawar News: '...त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच करेक्ट कार्यक्रम होईल; रोहित पवारांचा खोचक टोला

Maharashtra Politics: राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSaamTvNews

Rohit Pawar News:

महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नेते साथ सोडत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातील गळती थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. या बड्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. यावरुन थेट महाविकास आघाडीला फटका बसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

"महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) जे नेते बाहेर पडतील, यावरून महाविकास आघाडीला गळती नाही. तर भाजपमधल्या प्रवेशाने भाजप नेत्यांची डोके दुखी वाढेल. असे म्हणत पवारसाहेब यांच्यावर बोलण्याशिवाय भाजपचं गाडं पुढे चालतं नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल," असा दावाही रोहित पवार यांनी केला.

"भाजप सरकार कायदा कधी बघत नाही. रश्मी शुक्ला यांच्यावर या पूर्वी ही कारवाई करण्यात आली. फोन टॅपिंगमुळे लोकसभा- विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, म्हणून रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देत असावेत. माझा अंदाजाने काही नंबरफोन टॅपिंगला दिले असावेत, त्यात माझाही नंबर असावा," अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.

Rohit Pawar
LokSabha Election 2024 : शांतीगिरी महाराज पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; नाशिकमध्ये स्वतः उमेदवारी केली जाहीर

"पवार विरूद्ध पवार हेच भाजपला हवं होतं, मात्र चाणक्य लोकं मतांतून निर्णय घेतील. दादांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार ? पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये या मताचा मी आहे. मात्र भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण आहे," असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar
Marathwada Water Issue: मराठवाड्यावर जलसंकट! 'या' तीन जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा, खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com