Marathwada Water Issue: मराठवाड्यावर जलसंकट! 'या' तीन जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा, खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Marathwada Water Shortage:मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्हा सध्या पाणी टंचाईचा सामना करत आहे. या जिल्ह्यांमध्ये खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
Marathwada Water Issue
Marathwada Water IssueSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे

Sambhaji Nagar Jalna Beed Districts Water Crisis

यंदा संपूर्ण राज्यातच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अगदी तोंडचं पाणी पळाल्याची परिस्थिती झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत, तेव्हा संपूर्ण उन्हाळा कसा जाणार, हा भीषण प्रश्न समोर उभा आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील अशीच परिस्थिती आहे. (Latest Pune News)

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील 205 गावे 67 वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहे. खालावत चाललेली भूजलाची पातळी आणि घटता पाणीसाठा यामुळे नागरिक अगदी हैराण झाले (Marathwada Water Issue) आहे. मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभं राहिलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar), जालना (Jalna) आणि बीड (Beed) या जिल्ह्यांतील सुमारे 205 गावे आणि 67 वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसणं सुरू झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 126 गावे आणि 29 वाड्यांना सद्यस्थितीत पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. या गावांची तहान भागविण्यासाठी 189 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे.

पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. टँकर आणि अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी 340 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तीनही जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू (Marathwada Water Shortage) आहे. घटते पाणीसाठे व खालावत असलेली भूजल पातळी पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची सूचना देत आहेत.

Marathwada Water Issue
Water Shortage : १३ दिवसांपासून पाण्याची बोंबाबोंब; हांडे घेऊन महिलांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा

छत्रपती संभाजीनगरमधील 126 गाव व 29 वाड्या पाणीटंचाईला सामोरे जात (Water Crisis) आहे. छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, या तालुक्यांतील गाव तसेच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, पैठण आणि सिल्लोड तालुक्यांतील वाड्यांचा यामध्ये समावेश आहे.

पाणीपुरवठा करण्याकरिता या ठिकाणी शासकीय टँकरची सोय करण्यात आली आहे. मराठवाड्यात काटकसरीने पाण्याचा वापर सुरू आहे. फक्त माणसांचाच (Marathwada News) नाही, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.

Marathwada Water Issue
Water Scarcity : ढालेगाव बंधाऱ्यात ६ टक्के पाणी; पाथरी शहरावर पाणी टंचाईचे सावट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com