Pune : मुंब्र्यानंतर पुण्यात छापेमारी, कोंढव्यात एकजण ताब्यात, दहशतवादी जुबेर हंगरगेकरसोबत कनेक्शन

Maharashtra ATS Raids Pune : दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र एटीएसकडून राज्यभर छापेमारी सुरु आहे. मुंब्र्यानंतर आता पुण्यातील कोंढवा भागात छापा टाकण्यात आला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Maharashtra ATS
Maharashtra ATSSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • मुंब्रा परिसरानंतर पुण्यातील कोंढवा भागात एटीएसकडून छापेमारी करण्यात आली.

  • दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

  • मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरातही एटीएसने पुरावे जप्त केले.

maharashtra ats raid pune after delhi terror attack : दिल्लीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानंतर राज्यातील एटीएस पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जातोय. मंगळवारी मुंब्रा येथे शिक्षकाच्या घरात धाड टाकली होती. आज महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोंढवा भागात छापेमारी केली. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्यासोबत संपर्कात असल्याच्या संशायवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेय. दरम्यान, जुबेर हंगरगेकर याला काही दिवसांपूर्वी एटीएसने अटक केली होती.

दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी करत त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्या व्यक्तीच्या घराची झडती घेतली जात आहे. त्याच्या घरातून काही संशयास्पद वस्तू मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. महाराष्ट्र एटीएसकडून राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे.

Maharashtra ATS
Pune Metro : पुणेकरांचा नेम नाही, मेट्रोमध्ये केले प्री वेडिंग शूट, नंतर...

मुंब्र्यात शिक्षकाच्या घरावर धाड -

महाराष्ट्र एटीएसकडून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत काही संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत मुंब्रा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर एटीएसने ही धाड टाकली. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागात या शिक्षकाच्या निवासस्थानी तपास मोहीम राबवली. या वेळी अधिकाऱ्यांनी घराची तपासणी करून मोबाईल फोन, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर संबंधित शिक्षकाला अधिक चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले असून, तिथे एटीएसची तपास मोहीम सुरू आहे.

Maharashtra ATS
Pune Sambhajinagar : पुणे-संभाजीनगर महामार्ग नकाशा फुटला, धनदांडग्यांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी

माझ्या नवऱ्याचा संबंध नाही, शिक्षकाची बायको काय म्हणाली?

माझ्या पतीचा यात काहीही संबंध नाही. पुण्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नाही.. ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई मधील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असून रिटायर झाल्यानंतर ते घरीच असायचे.. त्यांना उगीच या मधे अडकवण्यात येत आहे.. असे यावेळी ATC मधील अटक संशयित आरोपी इब्राईम खलील आपदी यांच्या पत्नी म्हणाल्या.

Maharashtra ATS
Bank Fraud : ठाकरेंच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, माजी खासदारावर गुन्हा दाखल, बँक फसवणूक प्रकरणात अटक होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com