Maharashtra Election : महाविकास आघाडीचा ६ जागांवर गुंता; ठाकरे गटाकडून किती जणांनी एबी फॉर्म घेतला?

Mahavikas aghadi news : महाविकास आघाडीचा ६ जागांवर गुंता असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाने एकूण ९६ जणांना एबी फॉर्म दिला.
mva
MVA Seat Sharing Saam Tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे विधानसभा निवडणुकीमुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी अर्ज भरला. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रमुख लढाई पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे महायुतीसहित महाविकास आघाडीत ६ जागांवर गुंता पाहायला मिळत आहे. राज्यातील ६ जागांवर महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ९६ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहेत. त्यामुळे विधानसभेत ठाकरे गटाच्या ९६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे गटाच्या एकूण ९६ एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत हे अर्ज वाटप सुरु होते. ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी शेवटच्या दिवशीही अर्ज भरले आहेत.

mva
Maharashtra Legislative Assembly 2024 : सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? वाचा CM पासून DCM पर्यंत कुणाकडे किती संपत्ती

महाविकास आघाडीत ठाकरे गटाने ९६ जणांना एबी फॉर्म दिले. तर दुसरीकडे काँग्रेसने १०२ जणांना उमेदवारीसाठी अर्ज भरले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ८७ जणांना अर्ज दिले. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या २८५ जागा होतात. यात ६ ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे २८० जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांनी एकमेकांना साथ दिली आहे. त्यातील उर्वरीत ८ जागा या मित्र पक्षांसाठी सोडल्याचं दिसत आहे.

महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढत कोणत्या मतदारसंघात?

मिरज विधानसभा मतदारसंघ

शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते

काँग्रेस - मोहन वनखंडे

सांगोला विधानसभा मतदारसंघ

शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे

शेकाप - बाबासाहेब देशमुख

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ

काँग्रेस - दिलीप माने

शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील

mva
Baramati Assembly Constituency: पवार विरुद्ध पवार लढाई, अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये तगडी फाइट

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ

काँग्रेस भागीरथ भालके

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत

परांडा विधानसभा मतदारसंघ

शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे

दिग्रस विधानसभा मतदारसंघ

शिवसेना ठाकरे गट - पवन जैस्वाल

काँग्रेस -माणिकराव ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com