Mumbai Train Update : मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकलसेवा विस्कळीत, पनवेल ते बेलापूर वाहतूक ठप्प; मध्यरेल्वे १५ मिनिटं उशिराने

Mumbai Local Train News and Update (19 July) : मुंबईत लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे कामाला निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे.
Mumbai Local
Mumbai Local Saam TV
Published On

Mumbai Rain Update: मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Heavy Rainfall) लोकलसेवा (Mumbai Local)विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे (Central And Harbour Railway) वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानकावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तर मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर वेस्टर्न मार्गावरील (Western Railway) देखील वाहतूक देखील १० मिनिटं उशिराने सुरु आहेत. त्यामुळे कामाला निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. ऑफिसला उशिरा पोहचत असल्यामुळे आज मुंबईकरांना लेटमार्क लागणार आहे.

Mumbai Local
Jitendra Awhad on Kirit Somaiya: राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला, एखाद्याचे राजकीय जीवन संपवाण्याच्या प्रकाराचा मी निषेध करतो - जितेंद्र आव्हाड

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने -

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. धिमी आणि जलद मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. लोकलसेवा उशिराने सुरु असल्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Mumbai Local
Parbhani News : बैलांना चारा टाकायच्‍या नावाने गेला तो परतलाच नाही; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

पनवेल ते बेलापूरपर्यंत वाहतूक ठप्प -

हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सकाळपासून लोकलसेवा उशिराने सुरु होती. अशामध्ये पनवेल रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल ते बेलापूरला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणााऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबई आणि पनवेल या दोन्ही दिशेने कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.

Mumbai Local
Ashish Sakharkar Passes Away: मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्सचा मान पटकावणाऱ्या मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन

वेस्टर्न रेल्वेची वाहतूक उशिराने -

तर वेस्टर्न रेल्वे मार्गावर देखील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे वेस्टर्न रेल्वे मार्गावरील वाहतूक १० मिनिटं उशिराने सुरु आहे. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या दोन्ही दिशेची जलद आणि धिमी मार्गावरील लोकलसेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Mumbai Local
Maharashtra Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि PM मोदी यांच्यात काय चर्चा झाली?; मोठी माहिती आली समोर

अतिमुसळधार पावसाचा इशारा -

दरम्यन, आज मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस 100 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com