Jitendra Awhad About Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक सोमय्यांविरोधात आक्रमक झाले असताना दुसरीकडे जिंतेंद्र आव्हाड यांनी मात्र राकारणाचा स्तर प्रचंड खालावला असल्याचे मत व्यक्त केले आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जिंतेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही," असे आव्हाड यांनी म्हटले आहे. (Tajya Marathi Batmya)
थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी - आव्हाड
जिंतेंद्र आव्हाड म्हणाले, आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही." (Latest Political News)
जितेंद्र आव्हाडांनी सांगितला पवारांचा किस्सा
"मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही".
बाबा, हे अभिमानास्पद आहे- नताशा आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने त्यांच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. बाबा, जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे!, असे नताशा आव्हाडने म्हटले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.