Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जेस्पा सिंहाचा अखेर मृत्यू; वयाच्या ११ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईच्या प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जेस्पा नावाच्या सिंहाचा रविवारी मृत्यू झाला आहे.
Jespa lion
Jespa lion Saam tv
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जेस्पा नावाच्या सिंहाचा रविवारी मृत्यू झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला एकमेव सिंह होता. जेस्पाचा जन्म उद्यानातच २२ सप्टेंबर २०११ साली झाला होता. त्याला क्रोनिक ऑस्टियो संधिवात या विकाराने ग्रासले होते. यामुळे गेल्या महिनाभरांपासून त्याला उठताही येत नव्हते. (Latest Marathi News)

Jespa lion
रितेश-जेनेलियाच्या अडचणी वाढणार; भूखंड प्रकरणी मंत्री अतुल सावे यांचे चौकशीचे आदेश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून २२ सप्टेंबर २०११ रोजी जेस्पाचा जन्म झाला होता. मागील महिनाभरापासून जेस्पा आजारी होता. त्याला क्रोनिक आॅस्टियो संधिवात या विकाराने ग्रासले होते. यामुळे गेल्या महिनाभरांपासून त्याला उठताही येत नव्हते.

रवींद्र सिंहाला प्रदर्शनासाठी देखील सोडण्यात येत नव्हते. त्याच्यावर तज्ज्ञ पशू वैदयकांचे मार्गदर्शनाझाली उपचार सुरू होते. परंतु त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते.अखेरीस काल रविवारी त्याचा मृत्यू झाला.

Jespa lion
Pune Bus Fire : पुण्यातील चांदनी चौकाजवळ बसला भीषण आग; अग्निशमन दलाची २ वाहनं घटनास्थळी

उद्यानातील रवींद्र या १७ वर्षांच्या सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर उद्यानात जेस्पा हा एकमेव नर सिंह शिल्लक होता. मात्र त्याला देखील गंभीर क्रोनिक आॅस्टियो संधिवाताने ग्रासले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेहाचे शव विच्छेदन मुंबई (Mumbai) पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉ. गाढवे यांनी केले. प्राथमिक अहवालानुसार अंतर्गत अवयवांचे निकामी होणे आणि अशक्तपणा यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉ. गाढावे यांनी वर्तविली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com