'ऐसी दादागिरी नही चलेगी'; किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

'ऐसी दादागिरी नहीं चलेगी' पराग अग्रवाल यांच्या पत्नीला न्याय हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Saam Tv
Published On

मुंबई : लीलावती रुग्णालयात खासदार नवणीत राणा उपचार घेत असताना त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या प्रकरणी शिवसेनेने लीलावती रुग्णालयावर आक्षेप घेतला होता. बीएमसीने रुग्णालयाला नोटीसही पाठवली होती. या प्रकरणी आता लीलावती रुग्णालयाने रुग्णालयाचे सुरक्षा प्रभारी पराग जोशी यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'ऐसी दादागिरी नहीं चलेगी' पराग अग्रवाल यांच्या पत्नीला न्याय हवा, अशी मागणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवास्थानी हनुमान चालीसाचे पठण (Hanuman Chalisa Controversy) करू, असे आवाहन खासदार नवनीत (Navneet Rana) राणा यांनी दिले होते. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दरम्यान राणा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लीलावती (Lilavati Hospital) रुग्णालयात उपचारही घेतले. यावेळी रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडिओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Kirit Somaiya
केंद्र सरकारकडून कर कपात; पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या नवे दर

या फोटोप्रकरणी मुंबई महापालिकेने लिलावती रुग्णालयाला आता नर्सिंग कायद्याखाली नोटीस बजावली ((BMC Notice To Lilavati Hospital) होती. ४८ तासांत याचे उत्तर द्या असे निर्देश मुंबई महापालिकेने दिले होते. आता लीलावती रुग्णालयाने कारवाई करत सुरक्षा विभागाचे प्रभारी पराग जोशी यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

पराग जोशी यांच्या पत्नीला न्याय हवा आहे. लीलावती हॉस्पिटल नवनीत राणा MRI फोटो व्हायरल घटना. शिवसेनेची धमकी सुरक्षा प्रभारी पराग जोशी यांना रुग्णालय व्यवस्थापनाने बडतर्फ केले. "ऐसी दादागिरी नाही चलेगी", असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केले.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे दाऊद सोबतचे संबंध डेव्हलप करत असल्याची टीका किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com