मुंबईतील प्रसिद्ध लागबागच्या राजाचं प्रथम दर्शन आजपासून गणेशभक्तांना करता येणार आहे. आता पुढील दहा दिवस गणेशभक्तांना दर्शन घेता येणार आहे. यंदा लालबागच्या राजा गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा आहे. (Latest Marathi News)
लालबागच्या राजाची जगभर किर्ती आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९३४ पासून गणेशोत्सवाला सुरुवात केली. मुंबईतील कोळी समुदायाने या मंडळाची स्थापना केली आहे. हे ऐतिहासिक मंडळ गेल्या ९० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो गणेशभक्तांची रांग पाहायला मिळते.
लालबागमधील कोळी समुदायाने १२ सप्टेंबर १९३४ रोजी सार्वजनिक गणेशोत्सव करायला सुरुवात केली. लालबागमधील या मंडळाने लालबाग मार्केटमध्ये गणपती बसायला सुरुवात केली. तोच गणपती संपूर्ण मुंबई लालबागचा राजा या नावाने प्रसिद्ध झाला.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा पाहायला मिळणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं ३५० वे वर्ष आहे. तर लालबागच्या राजाचं ९० वे वर्ष आहे. राज्याभिषेकाचा देखावा हा जेष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कलात्मकतेने साकारण्यात आला आहे. दरवर्षी नितीन देसाईच लालबागच्या राजाचा देखावा साकारायचे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.