Anil Parab News, Kirit Somaiya News, Kirit Somaiya on Anil Parab
Anil Parab News, Kirit Somaiya News, Kirit Somaiya on Anil ParabSaam Tv

Kirit Somaiya : अनिल परब किती खोटे बोलणार? शिक्षा भोगावी लागणार; सोमय्यांनी ट्वीट केलेल्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय आहे?

अनिल परब यांनी ईडी कारवाईनंतर पुन्हा खुलासा केला की, ईडीने कारवाई केलेल्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही.
Published on

मुंबई : ईडीने काल दापोलीतील साई रिसॉर्ट ईडीसह इतर अशी 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी साई रिसॉर्ट विरोधात ही कारवाई आहे. साई रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांचं असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहे. मात्र अनिल परब यांनी ईडी कारवाईनंतर पुन्हा खुलासा केला की, ईडीने कारवाई केलेल्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही.

अनिल परब यांच्या दाव्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एक ट्वीट करत, अनिल परब किती खोटे बोलणार? असा सवाल त्यांना केला आहे. या ट्वीटसोबत किरीट सोमय्यांनी काही कागदपत्र जोडले आहेत.तसेच हा रिसॉर्ट अनिल परब यांनी विकत घेतल्याचं किरीट सोमय्या सांगत आहेत.

काय म्हटलं ट्वीटमध्ये?

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटलं की, अनिल परब किती खोटे बोलणार? 26 जून 2019 रोजी ग्रामपंचायतला परबांनी पत्र लिहिले की, विभास साठेकडून जमीन व रिसॉर्ट विकत घेतला. सदानंद कदमनी ग्रामपंचायतला 27 जानेवारी 2021 रोजी पत्र लिहिले की, अनिल परबकडून रिसॉर्ट विकत घेतला आहे. रिसॉर्ट अनिल परबनी बांधला शिक्षा भोगावी लागणार.

रत्नागिरीमधील साई रिसोर्ट प्रकरणात ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात काल मोठी कारवाई केली असून साई रिसॉर्टशी संबंधित दहा कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com