Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी, २२ मे रोजी पाणी पुरवठा राहणार बंद

Kalyan-Dombivli Water Supply: कल्याण-डोंबिवलीतीमध्ये २२ मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. १२ तास दोन्ही शहरात पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी,२२ मे रोजी पाणी पुरवठा राहणार बंद
Kalyan Dombivli Water Supply CutSaam tv
Published On
  • कल्याण- डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

  • २२ मे रोजी १२ तास पाणी कपात

  • केडीएमसीचा महत्वाचा निर्णय

  • एल निनोमुळे पाणीटंचाईची शक्यता

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये येत्या २२ मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी २२ मे रोजी शहराचा पाणीपुरवठा तब्बल १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

भारतीय हवामान खात्याने यंदा एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल च्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर १४ मे २०२६ रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्यातील महानगरपालिका, एमआयडीसी आणि संबंधित प्राधिकरणांनी समन्वयाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.

Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी,२२ मे रोजी पाणी पुरवठा राहणार बंद
Kalyan : ठाकरे गटाच्या बैठकीदरम्यान गोंधळ; दोन पदाधिकाऱ्यांकडून बड्या नेत्यावर मारहाणीचा आरोप, पक्षात खळबळ

या पाणी कपातीचा फटका कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागाला बसणार आहे. मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील गावांमधील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या महिन्यातील ही दुसरी पाणी कपात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी,२२ मे रोजी पाणी पुरवठा राहणार बंद
Kalyan Crime: कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com