Neral Crime: सख्खा भाऊच ठरला वैरी, कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा असा झाला उलगडा; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Karjat Tripple Killed Case: कर्जत तिहेरी हत्याकांडाचा उलगडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने आपल्या सख्ख्या भावासह त्याचे संपूर्ण कुटुंब संपवले. धक्कादायक कारण देखील समोर आले आहे. वाचा सविस्तर...
Neral Crime: सख्खा भाऊच ठरला वैरी, कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा असा झाला उलगडा; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Karjat Crime News Saam Tv
Published On

कर्जतच्या नेरळमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या मदन पाटील यांच्या सख्ख्या भावाला अटक केली आहे. आरोपीने तिघांच्याही हत्येची कबुली दिली. वडिलोपार्जित घर आपल्या नावावर करत नाही, रेशनचे धान्य मिळत नाही या रागातूनच आरोपीने आपल्या भावाची, वहिनीची आणि पुतण्याची निर्घृण हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घराजवळच्या नाल्यामध्ये फेकून दिले होते. आरोपीने या तिघांच्या हत्येसाठी कट रचला होता. चौकशीदरम्यान आरोपीने हे हत्याकांड कसं केलं हे पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

आरोपी हनुमंत पाटील आणि हत्या झालेली व्यक्ती मदन पाटील हे दोघे सख्खे भाऊ होते. दोघेही शेजारी शेजारी राहत होते. नेरळच्या चिकनपाडामध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. हे घर मदन यांच्या नावावर होते. रेशनकार्ड एकत्रित असल्यामुळे ते मदन यांच्याकडेच होते. अशामध्ये वडिलोपार्जित घर असल्यामुळे त्यातील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा आणि रेशन कार्ड मिळावे यासाठी हनुमंत भांडण करायचा. आपल्या हक्काचा हिस्सा देत नसल्याचा राग मनात ठेवून हनुमंतने भावासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला आणि त्यांची ८ सप्टेंबरला मध्यरात्री हत्या केली. सकाळी त्यांचे मृतदेह नाल्यामध्ये आढळून आले.

Neral Crime: सख्खा भाऊच ठरला वैरी, कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा असा झाला उलगडा; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Crime News : ऐकावे ते नवलच! वर्धा जिल्ह्यात दारूबंदी, त्यानं लढवली अजब शक्कल, पण पोलिसाच्या सापळ्यात कसा अडकला?

हनुमंतने आपला भाऊ, वहिनी आणि पुतण्याची हत्या कुऱ्हाडीच्या सहाय्याने केली. त्याने हत्या केल्यानंतर तिघांच्याही मृतदेहावर लगेच कापड झाकले. त्यामुळे रक्ताचे डाग भिंतीवर जास्त प्रमाणात उडाले नाहीत. हत्येच्यावेळी आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. हत्येनंतर त्याने लाल रंगाचा टी शर्ट घातला होता. या हत्येचा तपास करत असताना पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. गावातील शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हनुमंत सतत ये-जा करताना दिसाला होता. त्याचे हे येणं-जाणं संशयास्पद होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

Neral Crime: सख्खा भाऊच ठरला वैरी, कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा असा झाला उलगडा; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Shahada Crime : दुकानासमोरून जात असल्याच्या शुल्लक कारणातून खून; शहादा तालुक्यातील घटना, दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल

चौकशीदरम्यान आरोपीने समर्पकपणे उत्तरं दिली होती त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. पोलिस चौकशीदरम्यान आरोपीने गणपती सणासाठी मामाच्या घरी राहायला गेल्याचे सांगितले. गुन्हा घडला तेव्हा मी घरी नव्हतो तर मामाच्या घरी होतो असे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. पण नंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. सध्या आरोपी तुरुंगात असून लवकरच नेरळ पोलिस दीड महिन्यात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

Neral Crime: सख्खा भाऊच ठरला वैरी, कर्जतच्या तिहेरी हत्याकांडाचा असा झाला उलगडा; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Crime News : विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार, शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नागपूरमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com