Vishal Gawli : विशाल गवळीचा जेलमध्ये एंड, आत्महत्येवर गवळी कुटुंबाचा संशय; नेमकं प्रकरण काय?

Vishal Gawli Suicide : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीने आत्महत्या केली. तुरुंगातील या घटनेवरुन गवळी कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे.
Vishal Gawli ends life in jail family has different suspicions
Vishal Gawli ends life in jail family has different suspicionsSaam Tv News
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही

कल्याण : कल्याणमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीने तुरुंगातच आत्महत्या केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात होता. रविवारी पहाटेच्या सुमारास विशाल गवळीने स्वच्छतागृहीत टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या केली. दरम्यान विशालच्या आत्महत्येवर त्याच्या बहिणीने संशय व्यक्त केलाय तर आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशालच्या आईने केलीये. दुसरीकडे अक्षय शिंदेसारखं विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय आरोपीच्या वकिलांनीही व्यक्त केलाय.

नराधम विशाल गवळीची आत्महत्या

अल्पवयीन मुलीला घरात बोलावून लैंगिक अत्याचार

मुलीची निर्घृणपणे हत्या करत मृतदेह बॅगेमध्ये कोंबला

चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बायकोची साथ

गेल्या साडे तीन महिन्यापासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये

रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत जीवन संपवलं

Vishal Gawli ends life in jail family has different suspicions
Karun Nair Jasprit Bumrah : करुण नायर-जसप्रीत बुमराहचा भर मैदानात राडा, यॉर्कर किंग इतका का भडकला? नक्की चूक कुणाची?

नराधम विशालने जे कृत्य केलं होतं, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत 'जशास तसा' न्याय झाला, असं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं. पीडितेला आणि तिचा कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाल्याचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार सुलभा गायकवाड यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदेसारखाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी मागणी कल्याणमधल्या महिलांनी केली होती. आता यापुढे तरी अशी घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगारांना जरब बसेल असा कायदा करण्याची अपेक्षा व्य़क्त होतेय.

Vishal Gawli ends life in jail family has different suspicions
DC VS MI : १, २ नाही तर पळून काढल्या ४ धावा, शेवटच्या चेंडूवर नमन धीर-विल जॅक्सने दिल्लीला अचंबित केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com