Kalyan : "मी संविधान मानत नाही..." सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला बेड्या, कल्याणमधील घटना

Kalyan News : कल्याणमध्ये सोशल मीडियावर संविधानाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विनीत सिंगला पोलिसांनी अटक केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर महात्मा फुले चौक पोलिसांची तात्काळ कारवाई.
KALYAN MAN ARRESTED FOR ANTI CONSTITUTION SOCIAL MEDIA POSTS
KALYAN MAN ARRESTED FOR ANTI CONSTITUTION SOCIAL MEDIA POSTSSaam Tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक

  • विनीत सिंग हा चिकनघर परिसरातील रहिवासी असून फळ विक्रेता आहे

  • पोलिसांची तात्काळ कारवाई

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये सोशल मीडियावर संविधानाविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचा अवमान करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विनीत सिंग असे आहे. तो कल्याणमधील चिकनघर परिसरात वास्तव्यास आहे. तो फळ विक्रीचा व्यवसाय करत असून मूळचा प्रयागराज येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, विनीत सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने संविधानाविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत होता.

KALYAN MAN ARRESTED FOR ANTI CONSTITUTION SOCIAL MEDIA POSTS
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

त्याच्या या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही जागरूक नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने नागरिकांशी वाद घालत आपली भूमिका बदलण्यास नकार दिला. यामुळे संबंधित नागरिकांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विनीत सिंग याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

KALYAN MAN ARRESTED FOR ANTI CONSTITUTION SOCIAL MEDIA POSTS
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, त्याने आणखी कोणत्या प्रकारचे पोस्ट केले होते? याचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने वागावे. आक्षेपार्ह, भडकावू किंवा कायद्याचा अवमान करणारे कोणतेही पोस्ट टाकल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर बेजबाबदार वर्तन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com