अभिजीत देशमुख, कल्याण|ता. ५ फेब्रुवारी २०२४
उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली असून महेश गायकवाड यांच्याविरोधात कल्याणमधील बांधकाम व्यावसायिकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला आहे. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे समर्थक आणि व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले. कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (३७) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समोर आलेल्या माहितीनुसार, जितेंद्र रामअवतार पारीख हे व्हर्टेक्स स्काय व्हिला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी असून आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) या बांधकाम कंपनीशी संबंधित आहे, असेही सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर ७० लोक यांचा समावेश आहे.आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.