Ganpat Gaikwad: आमदार गणपत गायकवाड यांनी वापरलेले पिस्तूल कुणाचे? महत्वाची माहिती उघडकीस

Ulhasnagar Crime: उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयेत.
Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadSaam TV
Published On

तुषार ओव्हाळ

Ulhasnagar Crime:

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. पिस्तूलातल्या गोळ्या संपल्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून त्याच पिस्तूलाने त्यांना मारहाण केली. पण ही पिस्तूल कुणाच्या मालकीचे होते? याबाबत माहिती समोर आली आहे.

Ganpat Gaikwad
Shahaji Bapu Patil On Ulhasnagar : उल्हासनगर प्रकरणावर शहाजीबापूंनी दिली प्रतिक्रिया

उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयेत. पण ज्या पिस्तूलाने गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या ती पिस्तूल कुणाच्या मालकीची होती? तर ती पिस्तूल खुद्द गणपत गायकवाड यांच्या मालकीची होती.

पण गणपत गायकवाड यांच्याकडे पिस्तूल आली कशी, जर त्यांच्याकडे पिस्तूलचे लायसन्स होतं तरी त्यांना लायसन्स पिस्तूलाची गरज का पडली? जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या जिवाला धोका आहे असं वाटतं तेव्हा त्या व्यक्तीला आत्मरक्षणासाठी पिस्तूलाचं लायसन्स मिळतं. मग गणपत गायकवाड यांना कुणाकडून जिवाला धोका होता?

त्यामागची कथा अशी की, २०१७ साली नोव्हेंबरमध्ये गणपत गायकवाड यांना डॉन फटीचर गुंड उर्फ सुरेश पुजारी याने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हे पैसे न दिल्यास फटीचरने गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा आत्मसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याचे लायसन्स गायकवाड यांना मिळाले होते. तेव्हापासून गणपत गायकवाड हे आपल्याकडे पिस्तूल बाळगत आहेत.

२ फेब्रुवारीला उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या. डॉक्टरांनी या गोळ्या महेश गायकवाड यांच्या शरीरातून काढल्यात. पोलिसांनी या गोळ्या आणि पिस्तूल फॉरेन्सिक चाचणीसुद्धा पाठवल्यात.

फॉरेन्सिक अहवालात काय निष्कर्ष असतील आणि गणपत गायकवाड यांच्यावर अजून कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखत होतील ते आता हा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच कळेल.

Ganpat Gaikwad
Crime News: भररस्त्यातून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण, जबरदस्ती दारू पाजत धावत्या कारमध्ये अत्याचार; चौघांवर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com