मयूर राणे
गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईत येऊन मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतलंय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता.
पोलीस ठाण्याच्या परिसरात जमावाने घोषणाबाजी केली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मुफ्ती सलमान अझहरी यांनी ३१ जानेवारीच्या रात्री गुजरातच्या जुनागडमधील वी विभाग पोलीस ठाण्याजवळ कथित प्रक्षोभक भाषण केले होते. मात्र मध्य रात्रीच गुजरात पोलिसांकडून मुफ्ती यांना गुजरात येथे नेण्यात आले आहे.
मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, जमावबंदीचं उल्लंघन करणे आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत आरिफ सिद्दीकी आणि इब्राहिम हरबेट या दोन्ही वकीलांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की,"मौलाना मुफ्ती यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. १४१ ची नोटीस देखील त्यांना देण्यात आली नाही. सकाळी ११ वाजल्यापासून त्यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही याविरोधात हायकोर्टात जाणार आहोत आणि यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.