Gujrat Election Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या निकालाचे कल हाती येत आहेत. भाजप या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. (Election 2022)
गुजरातमध्ये 182 जागांसह यावेळी एकूण 1621 उमेदवार रिंगणात होते. त्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा आणि गुजरात सरकारच्या अनेक मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले होते. (Latest Marathi News)
याशिवाय हार्दिक पटेल, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी, जिग्नेश मेवाणी या दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचाही आज फैसला होत आहे. दिग्गजांचं आजच्या निवडणुकीत कय झालं यावर एक नजर टाकूया.
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अमी याज्ञिक यांचा 1 लाख 92 हजार 263 मतांनी पराभव केला आहे. तर भाजपने पाटीदार नेता हार्दिक पटेलला देखील उमेदवारी दिली होती. हार्दिकनेही मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. हार्दिकचे आपचे उमेदवार अमरसिंग आनंदजी ठाकोर यांचा 51 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनी भाजपच्या मुलुभाई यांच्यापेक्षा 17,356 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे विक्रम अर्जनभाई पिछाडीवर आहेत.
जामनगर उत्तर या जागेवरून भाजपने सध्या आघाडीवर असलेल्या क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आम आदमी पक्षाचे करसनभाई करमूर यांना 42,402 मतांनी मागे टाकले आहे.
वडगाम या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार जिग्नेश मेवाणी हे भाजपच्या मणिभाई यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून विजयी झाले होते.
मोरबी विधानसभा या जागेवरून भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या जयंतीलाल पटेल यांचा 62 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. याच मोरबीमध्ये गेल्या महिन्यात पूल दुर्घटना घडली होती, ज्यात 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अमृतिया यांनी अनेकांचा जीव वाचवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.