कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पगारवाढीसाठी कल्याण न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला आहे.
Protest for salary hike at Kalyan Court
Protest for salary hike at Kalyan CourtSAAM TV
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी विशेष समितीने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, २० महिने उलटूनही शासनाने यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. या आंदोलनात केवळ कल्याण न्यायालयातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ३४ ते ३५ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी असल्याचा दावा कर्मचारी प्रतिनिधींनी केला आहे. आजच्या पहिल्या दिवशीच्या आंदोलनात कल्याण न्यायालयातील जवळपास २०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून २० महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांपर्यंतही मागण्या पोहोचवण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून आणि शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

Protest for salary hike at Kalyan Court
Mumbai : तारीख पे तारीख...११२ वर्षांचा इतिहास असलेल्या सायन रेल्वे पूल पुनर्बांधणीनंतर वाहतुकीस खुला कधी होणार?

आंदोलनाची दिशा

उद्याही कर्मचारी काळ्या फिती लावूनच काम करून निषेध नोंदवणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. जर शासनाने यावर तातडीने योग्य निर्णय घेतला नाही, तर आगामी ५ तारखेला राज्यातील सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जातील असा कडक इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

Protest for salary hike at Kalyan Court
Childhood obesity: मुलांमधील वाढतं वजन ठरतंय चिंतेचा विषय; लठ्ठपणामुळे मधुमेहासह अनेक आजारांचा धोका

प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता

न्यालयीन कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून शासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा,अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com