बदनामीचा आरोप खोटा, नगरसेवकांच्या सुरक्षिततेसाठीच पोस्टर; गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

uddhav thackeray : नगरसेवकांच्या सुरक्षिततेसाठीच पोस्टर लावल्याची प्रतक्रिया ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
uddhav thackeray news
uddhav thackeray Saam tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं

बेपत्ता पोस्टरवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे यांची पहिली प्रतिक्रिया

संघर्ष गांगुर्डे साम टीव्ही

कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याच्या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोस्टर लावून बदनामी केल्याची तक्रार केल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोस्टर लावल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर बदनामीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे यांनी आरोप फेटाळून लावत माध्यमांना माहिती दिली आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी दिलेली माहिती खोटी आहे.

'आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन वडील आणि कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळी मधुर आमच्या संपर्कात नाही. संपर्क झाला तर आम्ही तुम्हाला सांगू, असं वडिलांनी सांगितल्याचं दुबे म्हणाले.

uddhav thackeray news
Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

आजपर्यंत ना नगरसेवकाचा ना त्यांच्या वडिलांचा कुठलाही संपर्क पक्षाशी झालेला नाही, त्यामुळे आम्हाला त्यांच्या सुरक्षिततेची चिंता आहे.सत्ता स्थापन होईपर्यंत नगरसेवकांना डांबून ठेवले असण्याची किंवा अपहरणाची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार व पोस्टर लावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नगरसेवकांची बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नसून त्यांच्या हितासाठीच हा पाठपुरावा करण्यात आल्याचं ठाकरे गटाने सांगितलं आहे.

uddhav thackeray news
Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात; तिघांचा मृत्यू

नगरसेवकाच्या वडिलांनी कोणाविरोधात तक्रार केली?

नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अदखलपात्र तक्रार दाखल केली. आमचा मुलगा आमच्या संपर्कात असून तो देवदर्शनासाठी गेलाय. त्याचे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून बदनामी करत आहे, असा आरोप वडिलांनी केला आहे. ठाकरे गटाच्या युवा सेना अधिकारी नीरज कुमार आणि त्याच्यासोबत असलेले दोन ते तीन पदाधिकाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाकडून बेपत्ता पोस्टर कल्याण पूर्वेत लावण्यात आले होते. त्या पोस्टर विरोधातच मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com