Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

Salman Khan News : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय...यात सलमान खानने MIM मध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच ओवैसींच्या पक्षात सलमाननं प्रवेश केलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Salman Khan
Salman Khan newsSaam Tv
Published On

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने राजकारणात एन्ट्री केलीय...सलमान खानने MIM मध्ये प्रवेश केल्याची घोषणा करतानाचा व्हिडिओ जारी केलाय असा दावा करण्यात आलाय...यात स्वत: सलमान खान आपण MIMमध्ये प्रवेश केल्याचं सांगताना दिसतोय...पण, खरंच महाराष्ट्रातील MIMच्या यशानंतर सलमानने प्रवेश केलाय का...? सलमान आता MIMकडून निवडणूक लढणार आहे का...? असे प्रश्न उपस्थित केले जातायत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...

Salman Khan
काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

याच व्हिडिओवरून आता खळबळ उडालीय...खरंच सलमान खान आणि औवेसी यांची भेट झालीय का...? औवेसींच्या उपस्थितीत सलमान खानने पक्ष प्रवेश केलाय का...? प्रवेश केला असेल तर सलमानने कधी पक्ष प्रवेश केला...? MIMकडून सलमान निवडणूक लढणार आहे का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...तसंच सलमानने MIM मध्ये प्रवेश केलाय का...? हे तपासून पाहिलं...मात्र, अशी माहिती कुठेही माहिती मिळाली नाही...मग आम्ही हा सलमानचा व्हिडिओ कधीचा आहे हे तपासून पाहिलं...

Salman Khan
बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

या व्हिडिओतील पहिल्या विंडोतील व्हिडिओ हा तयार करण्यात आलाय...आणि दुसऱ्या विंडोतील व्हिडिओ त्यासाठी वापरण्यात आलाय...यामुळे अनेकांना सलमानने MIMमध्ये प्रवेश केल्याचं वाटू लागलंय...मात्र, आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

सलमान खानने MIM मध्ये प्रवेश केलेला नाही

सलमान खानचा व्हिडिओतील आवाज AI निर्मित

सलमानचा जुना व्हिडिओ वापरून व्हिडिओ बनवला

Salman Khan
उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून सलमान खानने MIMमध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला...मात्र, सलमानने कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही...तो सध्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्थ आहेत...त्यामुळे आमच्या पडताळणीत सलमान खानने MIMमध्ये प्रवेश केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com