कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्यांवर समाधान निघणार? रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर, DRM च्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Kalyan-Dombivli Local Train Issues: कल्याण-डोंबिवलीच्या लोकल प्रवाशांच्या गर्दी, ट्रेन विलंब आणि इतर समस्यांवर रवींद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांची भेट घेतली. या बैठकीत ट्रेनमधील जीवघेणी गर्दी, ट्रेनची रखडपट्टी आणि वारंवार होणाऱ्या विलंबामुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
Ravindra Chavan meeting with Central Railway DRM over Kalyan Dombivli commuter issues
Ravindra Chavan meeting with Central Railway DRM over Kalyan Dombivli commuter issuessaam tv
Published On: 
Summary
  • रेल्वे प्रशासनाच्या पुढील उपाययोजनांकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

  • लोकलमधील प्रचंड गर्दी, ट्रेनची रखडपट्टी आणि वारंवार होणारा विलंब हे प्रमुख मुद्दे

  • कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी, ट्रेनची रखडपट्टी आणि रोजच्या लेटमार्कमुळे नोकरदार वर्ग त्रस्त झालाय. प्रवाशांच्या या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून यापार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक (डीआरएम) हिरेश मीना यांची भेट घेतली. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील मुख्यालयात रेल्वे अधिकारी आणि आमदार चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

Ravindra Chavan meeting with Central Railway DRM over Kalyan Dombivli commuter issues
Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

गेल्या महिन्यात २६ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी प्रतिनिधींनी डोंबिवली, दिवा आणि निळजे परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांसह त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. चाकरमान्यांच्या याच अडचणींची गंभीर दखल घेत आणि त्यावर मार्ग काढण्याच्या उद्देशाने या मुख्यालयातील महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

Ravindra Chavan meeting with Central Railway DRM over Kalyan Dombivli commuter issues
Mumbai Local Train : मध्य रेल्वेवर आजपासून धावणार १५ डब्यांच्या १० लोकल ट्रेन, वेळापत्रक आलं समोर

या बैठकीदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. गर्दीच्या वेळी निळजे स्थानकातून मुंबईकडे दर तासाला रेल्वे सुरू करण्याची प्रमुख मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. यासोबतच ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची होणारी प्रचंड कोंडी फोडण्यासाठी डोंबिवली आणि दिवा स्थानकातूनही मुंबईकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी देखी आमदार चव्हाण यांनी केली. तसेच प्रवाशांची सुरक्षा, स्थानकांवरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि सातत्याने उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या समस्येवरही चर्चा या बैठकीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com