गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. अनेक कटुंब आणि मंडळांनी गणेशमूर्तीच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली आहे. गणरायाचं आगमन एका दिवसांवर येऊन ठेपलं असताना रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरूच असल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)
गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असताना कल्याण-डोंबिवली शहरात अद्याप बहुतेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम सुरुच आहे. यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला प्रश्न करत घेरलं आहे. शिवसेना पदाधिकारी मोहन उगले यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सवाल करत टीका केली आहे. '
शिवसेना पदाधिकारी मोहन उगले यांनी म्हटलं की, 'केडीएमसीत काही विद्वान अधिकारी आले आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन त्यांची विद्वत्ता दाखवावी. अनेक ठिकाणी गणेशमूर्तीचं आगमन झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येणारे १६ कोटी रुपये कुठे गेले? असा थेट सवाल विचारला आहे. तसेच आयुक्त कामात दिरंगाई व निष्कर्षीपणा करणाऱ्या अधिकारी ठेकेदारांवर कारवाई करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते . तसेच खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. मात्र, गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आगे. मात्र, दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अजूनही खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.
तत्पूर्वी, रस्त्यावरील खड्डे बुडविण्यात नित्कृष्ठ दर्जाचे काम केले जात असल्याची पोलखोल शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यानी नुकतंच केलं होतं. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रशासनाला जाब विचारला होता . यानंतरही महापालिका आयुक्तांनी दिलेल्या डेडलाईन उलटून गेली तरी कामे अद्याप पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.