Kalyan Politics : कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक

Kalyan Political News : कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. 'लाडकी बहीण योजने'आडून होण्याला लूट होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक
Kalyan Politics Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे . या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची धावपळ सुरु आहे. याचदरम्यान, या योजनेच्या कागदपत्रांच्या आडून काही महा ई सेवा केंद्र चालक, काही कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी केला आहे.

महा-ई-सेवा केंद्राकडून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पैसे मागितल्याचाही आरोप पोटे यांनी केला आहे.लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा, अशी मागणी पोटे यांनी केली आहे. तसेच या योजनेसाठी महिलांना राष्ट्रीय बँकेत अडीच हजार रुपये खाते उघडण्यासाठी लागतात. त्यामुळे राष्ट्रीय बँकांना झिरो बॅलन्स अकाउंट देण्याचा सूचना करण्याची मागणी पोटे यांनी यावेळी केली.

कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक
Kalyan News : बोगस आरपीएफ जवानाच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर; भरतीसाठी एकाने घेतले लाखो रुपये

काँग्रेस नेत्यांचं म्हणणं काय?

लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय, सेतू आणि आपले सरकार या कार्यालयात महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र तयार करण्यासाठी या गरजू महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे लागतात. त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कल्याणमधील काही महा ई सेवा केंद्रातील कर्मचारी, चालक हे महिलांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला आहे. यावेळी पोटे यांनी एका ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला चांगलेच फैलावर घेत जाबही विचारला.

कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक
Kalyan Crime : इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप

महिलांकडून कागदपत्रांच्या पूर्ततासाठी महा ई-सेवा केंद्रे १ ते ३ हजार रुपये घेत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची लूट करणाऱ्या या लाडक्या भावाना सरकारने आवरावे. राष्ट्रीय बँकांमध्येही खाते उघडण्याकरीता अडीच हजार रुपये आकारले जात आहेत. महिला हे पैसे कुठून आणणार ? असा सवाल करत शासनाने राष्ट्रीय बँकांना झिरो बॅलन्स अकाउंट देण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी पोटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com