कल्याणमध्ये १८४ रहिवाशांची १७६ कोटींची फसवणूक? बड्या बिल्डरविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

Kalyan Chikanghar Redevelopment Fraud: कल्याण पश्चिमेतील चिकणघरच्या पुनर्विकास प्रकल्पात १८४ रहिवाशांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय. बिल्डरसह संबंधितांविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल.
Kalyan Chikanghar Redevelopment Fraud
Kalyan Chikanghar redevelopment project 176 crore fraud allegationsaam tv
Published On: 
Summary
  • चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पावरून वाद

  • या प्रकल्पात १८४ रहिवाशांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

  • पुनर्विकासाचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने फ्लॅटचा ताबा मिळण्यात अडचणी आल्याचा तक्रारदारांचा आरोप

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पात १८४ रहिवाशांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी टायकून समूहाचे बिल्डर श्रीकांत शितोळे यांच्यासह चेतन सराफ, महेश गोसावी आणि अन्य संबंधितांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी टायकून बिल्डरकडे देण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मूळ रहिवाशांसह नव्या सदनिका खरेदीदारांनाही घराचा ताबा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारदार नंदा म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील ११ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१ साठी ३९ लाख ३६ हजार ६९ रुपये भरले होते.

जुलै २०२५ पर्यंत घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र,निर्धारित मुदत उलटूनही सदनिकेचा ताबा मिळालेला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या प्रकल्पाचे बांधकाम दहाव्या मजल्यापर्यंत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापुढील काम अर्धवट आहे. पुनर्विकास, घरांचा ताबा आणि आर्थिक व्यवहाराबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल १८४ जणांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Kalyan Chikanghar Redevelopment Fraud
Pradeep Purnekar:एक गोळी मानेच्या आरपार, एक छातीत अडकली; प्रदीप पुर्णेकरांचा CT स्कॅनचा रिपोर्ट आला समोर

दरम्यान, टायकून समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदार महिलेचा सदनिका खरेदीचा व्यवहार सुमारे ४० लाख रुपयांचा असताना १७६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे समूहाने म्हटले आहे. विविध प्रकल्पांना धोरणात्मक त्रुटींमुळे विलंब झाला असून संबंधित प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असल्याने ग्राहकांनी रेरा प्राधिकरणाकडे दाद मागावी, असेही समूहाने स्पष्ट केले आहे.

काही स्थानिक विरोधक आणि नेत्यांकडून प्रकल्पातील अडचणींचा गैरफायदा घेत बिल्डरवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही टायकून समूहाने केला आहे. केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी निधीच्या वित्तपुरवठ्याला अंतिम मंजुरी मिळाल्याचा दावा समूहाने केला असून, काही ग्राहकांना हाताशी धरून प्रकल्प बळकावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचेही समूहाने म्हटले आहे.

Kalyan Chikanghar Redevelopment Fraud
राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

या संदर्भातील पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा टायकून समूहाने केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासात आरोपांमागील आर्थिक व्यवहार, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि संबंधित पक्षांची भूमिका याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com