मुंबई: राज्यातील 29 महापालिकेच्या मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना आता राज्यातील राजकारण चांगलेच आहे. भाजपने यावेळी अनोखी रणनीती आखत इतर राज्यातील भाजप नेत्यांना स्टार प्रचार यादीमध्ये स्थान दिले होते. उत्तरभारतीयांना आकर्षित करण्यासाठी रवी किशन, मैथिली ठाकूर यांना उतरवले आहे तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य लोक हे स्थायिक असल्याने तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के आन्नामलाई यांना धारावीमध्ये प्रचारासाठी उतरवले होते.
मात्र प्रचारात त्यांनी Bombay is Not A Maharashtra City असे विधान केल्याने राज ठाकरे यांनी त्यांचा कालच्या भाषणात चांगलाच समाचार घेतला होता. मुंबई हे केवळ महाराष्ट्रासाठी सीमित नसून ते आंतराष्ट्रीय दर्जाचे स्थळ आहे. असे म्हटले होते.
काय म्हणाले के आन्नामलाई?
यावरच रविवारी झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेमध्ये राज यांनी आन्नामलाई यांचा चांगलाच समाचार घेतला. यालाच आता आन्नामलाई यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राज ठाकरे, आदित्य ठाकरे मला धमक्या देणारे कोण? मला शिवीगाळ करण्यासाठी त्यांनी सभा घेतली. मी मुंबईत आलो तर माझे पाय कापतील, असे काहीनी म्हटले. मी मुंबईत येणारच हिंमत असेल तर पाय कापून दाखवा. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे असे मी म्हटले. याचा अर्थ मुंबई उभारण्यात महाराष्ट्रीयन लोकांचा काहीच वाटा नाही असा होतो का? हे लोक अडाणी आहेत. असे पलटवार के आनामलाई यांनी ठाकरेंवार केला.
धारावीतील तमिळभाषिक आक्रमक
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तामिळ नेते आन्नामलाईंवर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज धारावीत विशेष बैठक आयोजित केली आहे. महायुतीचे उमेदवार रवी राजा आणि कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे. दुपारी २:३० वाजता धारावीतील निवडणूक कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडेल. या बैठकीत तामिळ भाषिक आपली पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.