GST चे सहआयुक्त कालपासून बेपत्ता; कुटुंबियांनी दिली हरवल्याची तक्रार
GST चे सहआयुक्त कालपासून बेपत्ता; कुटुंबियांनी दिली हरवल्याची तक्रारसुरज सावंत

GST चे सहआयुक्त कालपासून बेपत्ता; कुटुंबियांनी दिली हरवल्याची तक्रार

बुधवारी सकाळी ते माझगाव येथील GST भवनमधील कार्यालयात हजर झाले. दुपारी कार्यालयातून बाहेर पडले त्यानंतर ना ते कार्यालयात परतले, ना घरी.
Published on

मुंबई : GST चे सह आयुक्त राजेसाहेब माने 55 हे बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी (Byculla police) त्यांच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करत अधिक तपास सुरु आहे.

GST चे सहआयुक्त कालपासून बेपत्ता; कुटुंबियांनी दिली हरवल्याची तक्रार
Mumbai : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कोविड पॉझिटिव्ह !

कांदिवली (Kandivali) येथे राहात असलेले राजेसाहेब माने 55 हे GST विभागात सहआयुक्त (Joint Commissioner) म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते माझगाव येथील जीएसटी भवनमधील कार्यालयात हजर झाले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ना ते कार्यालयात परतले. ना घरी पोहचले. माने यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून माने हरवल्याची तक्रार दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com