Jitendra Awhad : माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on mahad agitation : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा चूक झाल्याची कबुली दिली. माझ्याकडून चूक झाली आहे, मला फाशी द्यायची तर द्या, असेही आव्हाड यांनी सांगितले.
माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad ApologySaam TV

ठाणे : शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडला गेला. यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. याचदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा चूक झाल्याचे स्पष्ट केले. तसेच माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाडमधील आंदोलनात चूक घडल्याचे स्पष्ट केले. आव्हाड म्हणाले,'माझे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत. मी त्यांचा आयुष्यभर विरोध करणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्यांची माफी मागितली आहे.

'भगतसिंह कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली होती का? मला मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच ठिकाणी ९७ वर्षांनी मनुस्मृती जाळली. मला फाशी द्या. मी मरणाला घाबरणारा कार्यकर्ता नाही'.

माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड
Maharashtra Politics: 'जेलमध्ये जायचं नसेल तर ३ दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागा', शिवसेना शिंदे गटाचा संजय राऊतांना इशारा!

'185 किलोमीटर दूर जाऊन मूर्ख झालोय का? मी गुन्हे झेलायला तयार आहे. मला तुरुंगात टाका, माझा लढा वैयक्तिक नाही. माझा कोणीही खून करणार नाही. विचारांची लढाई कायम राहील. जेव्हा भिडे, कोश्यारी, चंद्रकांत पाटील बोलले, तेव्हा कोणीही बाहेर आले नाही. ही लढाई विचारांची आहे, असे आव्हाड म्हणाले.

माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड
Chhagan Bhujbal News: 'त्यांनी माफी मागितली, भावना लक्षात घ्यायला हवी', छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण!

'माझ्या बापाचा फोटो फाडला, म्हणून माफी मागितली, असे ते म्हणाले. पोर्शे कार अपघाताचा मुद्दा मागे टाकण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com