Maharashtra Politics: 'जेलमध्ये जायचं नसेल तर ३ दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागा', शिवसेना शिंदे गटाचा संजय राऊतांना इशारा!

Sanjay Nirupam On Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना शिंदे गटाबाबत केलेल्या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरुन शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेत राऊतांना कारवाईचा इशारा दिला आहे.
Maharashtra Politics: 'जेलमध्ये जायचं नसेल तर ३ दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागा', शिवसेना शिंदे गटाचा संजय राऊतांना इशारा!
Sanjay Raut|Eknath ShindeSaam tv

मुंबई, ता. ३० मे २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) एकही उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या यंत्रणेने प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपांवर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तीन दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी न मागितल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.

काय म्हणाले संजय निरुपम?

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्हे करतात आणि कोणतेही तथ्य नसताना आरोप करतात. सामनामध्ये त्यांनी लिहिले होते की, अजित पवार यांचा एकही उमेदवार विजयी होऊ नये यासाठी शिंदे यांच्या कडून पैसा खर्च केला. हे सर्व आरोप खोटे असून संजय राऊत यांनी येत्या ४८ तासात मुख्यमंत्र्यांकडे माफी मागितली नाहीतर कारवाई होणार, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.

"त्यांना तुरुंगात जायचे नसेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी. शिवसेनेकडून संजय राऊत यांच्यावर कारवाईची तयारी सुरू आहे. तसेच पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ते जामिनावर असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आणि ते कधीही तुरुंगात जाऊ शकतात. त्यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात पाठवले जाऊ शकते," असेही संजय निरुपम यावेळी म्हणाले.

Maharashtra Politics: 'जेलमध्ये जायचं नसेल तर ३ दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागा', शिवसेना शिंदे गटाचा संजय राऊतांना इशारा!
Chhagan Bhujbal News: 'त्यांनी माफी मागितली, भावना लक्षात घ्यायला हवी', छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण!

काँग्रेसवर निशाणा..

दरम्यान, पंतप्रधान मोदी ध्यानधारणा करणार असून त्यावरून काँग्रेस संतापली आहे. ती पूर्ण ताकदीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहे. हा मूर्खपणा आहे. पूजा आणि ध्यान करणे बेकायदेशीर आहे का? प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग आहे.कोणी तप करून शांती प्राप्त करतात, तर कोणी तन सेवन करून, असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला.

Maharashtra Politics: 'जेलमध्ये जायचं नसेल तर ३ दिवसात मुख्यमंत्र्यांची माफी मागा', शिवसेना शिंदे गटाचा संजय राऊतांना इशारा!
Jitendra Awhad : माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या - जितेंद्र आव्हाड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com