Vidhimandal Lobby Fight Video : विधीमंडळाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, वादाची ठिणगी कुठे पडली?

Vidhimandal Lobby Fight Video news : विधीमंडळाच्या लॉबीत हाणामारी झाल्याची घटना घडली. आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. या वादाची ठिणगी कुठे पडली? जाणून घेऊयात.
Vidhimandal Lobby Fight
Vidhimandal Lobby Fight Video news Saam tv
Published On

विधानभवनातील लॉबीमध्ये जिंतेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारी झाली. या हाणामारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. विधीमंडळ लॉबीतच दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा केला. दोन्ही कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे विधीमंडळात तणावाचं वातावरण निर्माण झालं. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वादाची ठिणगी कुठे पडली, सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार संजय देशमुख यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला माराहाण केल्याची झोड उठवली जात होती. त्यानंतर काही दिवसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्ष टोमणा मारला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या टोमण्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून जितेंद्र आव्हाडांना ट्रोलिंग सुरु केलं होतं.

Vidhimandal Lobby Fight
Maharashtra Politics : जिल्हाप्रमुख विकणे आहे, ठाकरे सेनेचं होर्डिंग; राजकीय चर्चांना उधाण, VIDEO

पावसाळी अधिवेशनात वादानंतर दुसऱ्या दिवशी गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. पडळकरांची शिवीगाळ देखील कॅमेऱ्यात कैद झाली होती . "दाखव की मी इथे एकटाच आहे. तुझ्या *** किती दम आहे बघतो. तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही, असं पडळकरांनी म्हटलं होतं.

Vidhimandal Lobby Fight
Extramarital affair Case : दोन मुलांच्या आईचे अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडचा लग्नासाठी नकार; बलात्काराची तक्रार, कोर्टाने महिलेला फटकारले, नेमकं काय घडलं?

पडळकरांच्या हाणामारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनीही माध्यमांशी बोलताना पडळकरांवर टीका केली होती. त्यानंतर, मी मंगळसूत्र चोर ओरडल्याचं तुम्हाला का वाईट वाटत आहे? असा सवाल आव्हाडांनी पडळकरांना केला होता. आज गुरुवारी विधानभवनात असताना जितेंद्र आव्हाड यांना मोबाईलवरून धमकीचे मेसेज आले. त्यानंतर महाराष्ट्रात काय सुरू आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला.

Vidhimandal Lobby Fight
Swachh Bharat Mission : पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा; सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत पटकावला ८ वा क्रमांक

दरम्यान, आज गुरुवारी विधीमंडळाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकरांच्या कार्यर्त्यांनी मारहाण केली. यावेळी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाल्याचं दिसत आहे.. कार्यकर्त्यांनी कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली. दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांची हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com