Jejuri Morgaon Accident : जेजुरीत अपघाताचा थरार! ८ जणांचा जागीच मृत्यू, मृतांची नावे आली समोर

Jejuri Morgaon Accident victims list : पुण्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
jejuri accident news
jejuri accident Saam tv
Published On

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. कार आणि पीकअप टेम्पोंच्या धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताची घटना गुरुवारी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात काही जण पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याचंही वृत्त आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत.

जेजुरी-मोरगा रोड मार्गावर असलेल्या किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्याजवळ अपघाताची ही भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर उभे असलेले लोक दृश्य पाहून हादरले. अपघातानंतर लोकांची एकच धावाधाव झाल्याची दिसून आली.

jejuri accident news
BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी आखला मास्टर प्लान, VIDEO

नेमकं काय घडलं?

जेजुरी-मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाबा समोर एक भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. पुण्याहून मोरगावकडे जाणारी कार ही जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला मधील साहित्य खाली करत असताना जोरदार धडक दिली. भरधाव कारची धडक इतकी जोरात होती, या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

jejuri accident news
Vastu Tips: घरात शिवलिंग ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तुचे नियम

मृतांची नावे

किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश), सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com