Vastu Tips: घरात शिवलिंग ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तुचे नियम

Dhanshri Shintre

शिवलिंग घरी ठेवणे

घरात अनेकजण रोज भगवान शिवाची पूजा करतात. मात्र, अनेकांना शंका असते की शिवलिंग घरी ठेवणे योग्य आहे की नाही.

वास्तुशास्त्रातील नियम

घरात शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते, मात्र वास्तुशास्त्रातील काही नियम पाळल्यासच त्याचे पूर्ण फल मिळू शकते.

अंगठ्याहून मोठा नसावा

शिवलिंग घरात ठेवताना त्याचा आकार अंगठ्याहून मोठा नसावा, म्हणजेच तो ४ इंचांपेक्षा लहान असावा, असे सांगितले जाते.

एकच शिवलिंग ठेवणे

घरात फक्त एकच शिवलिंग ठेवणे योग्य मानले जाते, एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे अशुभ समजले जाते.

कोणती काळजी घ्यावी?

शिवलिंग नेहमी पाण्याच्या भांड्यात ठेवावे आणि त्यातील पाणी कधीही आटू नये याची विशेष काळजी घ्यावी.

कोणत्या दिशेले ठेवावे?

वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग पश्चिमेला ठेवावे आणि त्यातून वाहणारे पाणी नेहमी उत्तर दिशेला जावे, हे शुभ मानले जाते.

कोणते शिवलिंग ठेवावे?

घरात पारद किंवा स्फटिक शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते, कारण ते सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक लाभ वाढवते.

NEXT: घरात कचराकुंडी ठेवण्यासाठी कोणती दिशा सर्वोत्तम मानली जाते, जाणून घ्या वास्तु तज्ज्ञांचे मत

येथे क्लिक करा