Vasai News: वसईच्या वर्सोवा पुलाजवळ मातीचा ढिगारा खचला, जेसीबी चालक ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरू

Vasai Accident News: वसईच्या वर्सोवा पुलाजवळ मातीचा ढिगारा खचला, जेसीबी चालक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. शिवाय मुंबई अहमदाबाद महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Vasai Accident News
Vasai News Saam Tv

वर्सोवा ब्रिजच्या बाजूला सूर्या प्रकल्पाचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा खचून जेसीबी चालक या ढिगार्‍याखाली गाडला गेला आहे. याची तात्काळ माहिती एनडीआरएफच्या टीमला देण्यात आली मात्र जमीन खचण्याचा पुन्हा धोका येत असल्याने जेसीबी चालकास वाचवण्यात अपयश एनडीआरएफच्या टीमला येत आहे.

Vasai Accident News
Mumbai Mega Block News: मेगाब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे दरम्यान 29 एक्सप्रेस रद्द, लोकल प्रवाशांचेही हाल होणार

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा ब्रिजच्या बाजूला सूर्या(surya) प्रकरल्पाचे काम सुरु आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास प्रकल्पाच्या ठिकाणी मातीचा ढिगारा खचला गेल्याने त्याच ढिगार्‍यात एक जेसीबी चालक गाडला गेला आहे. या घटनेची माहिती एनडीआरएफला देण्यात आल्यानंतर साधारण दहा तासानंतर घटनास्थळी पोहचली. पंरतू जमीन खचण्याचा धोका आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी यंत्रसामुग्री नसल्याने चालकास ढीगार्‍यातून बाहेर काढण्यास अपयश येत आहे.

सध्याची परिस्थिती

तब्बल मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या जेसीबी चालकाचा काल रात्री पासून शोध सुरु आहे मात्र याला १२ तास उलटले तरी अद्यापही जेसीबी(JCB) चालकाचा शोध लागला नाही. घटनास्थळी एनडीआरफच्या दोन टीम दाखल झाल्या असून यात एका श्वानाचा देखील सहभाग करण्यात आलेला आहे.

१२ तासांचा अवधी होऊनही कंपनीकडून कोणत्याही हालचाली न केल्याने संबंधित जेसीबी चालकाचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. या टनेलचा काम करत असताना मीम टाकण्याऐवजी आरसीसी केल्यामुळे हा अपघात घडल्याचा सूत्रांनी माहिती दिली आहे

मुंबई अहमदाबाद महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका रेस्क्यू ऑपरेशनला बसला आहे. या वाहतुक कोंडीमुळे रेस्क्यू ऑपरेशनसाठी मोठ्या यंत्रसामग्री आणण्यास त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पालघर कडून मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या लेन मध्ये वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत .

Vasai Accident News
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण मुंबईत उद्यापासून ५ टक्के पाणीकपात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com