Jayant Patil: 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? जयंत पाटलांचा शिंदे सरकारला सवाल

Jayant Patil Latest News: 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Jayant Patil question to Shinde government regarding the drought situation in Maharashtra
Jayant Patil question to Shinde government regarding the drought situation in MaharashtraSaam TV
Published On: 

Jayant Patil Latest News: गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील शेतीपिकांचं मोठं नुकसान होत असून बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. (Latest Marathi News)

Jayant Patil question to Shinde government regarding the drought situation in Maharashtra
Santosh Bangar News: कावड यात्रेत डीजे वाजवत तलवार फिरवली; शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल उपस्थित करत जयंत पाटील यांनी (Jayant Patil) संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून महायुती सरकारला खडेबोल सुनावले. जयंत पाटील यांनी ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

"सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे".

"राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या  हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे", असं जयंत पाटील म्हणाले.

खरीपातील बहुतांश पिकांचं नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com