मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

Jalinder Kamte Death Reason Heart Attack Pune: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जालिंदर कामटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. त्यांच्या निधनाने पुणे आणि राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
Late NCP leader and former Pune Zilla Parishad President Jalinder Kamte
Late NCP leader and former Pune Zilla Parishad President Jalinder Kamtesaam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे आज दुःखद निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. काल सायंकाळी जेवणानंतर ते आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. त्यानंतर ते सकाळी नित्य नियमाप्रमाणे सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी उठले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी नऊ वाजता दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढलं व वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Late NCP leader and former Pune Zilla Parishad President Jalinder Kamte
Sachin Ahir: मोठी बातमी! सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती, एकमताने झाली बिनविरोध निवड

सायंकाळी कोंडवा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव होते. 1999 ते 2002 या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीतून तयार झालेले जालिंदर कामटे हे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचा लौकिक होता. पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी तसेच पुणे विद्यापीठावरील त्यांची अनेक आंदोलने गाजली.

Late NCP leader and former Pune Zilla Parishad President Jalinder Kamte
Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद, पाहा VIDEO

काँग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या 1992 ते 98 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि महिला आणि बालकांच्या समितीच्या सभापती होत्या. 1997 मध्ये जालिंदर कामटे हे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 1999 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2015 ते 2018 दरम्यान ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. राजकारणासाठी हवेली तालुक्याबरोबरच पुरंदर तालुक्यातील त्यांनी आपले राजकीय कार्यक्षेत्र निर्माण केले. स्वर्गीय वसंत दादा पाटील हे त्यांच्या गुरुस्थानी होते. त्यांच्या नावाने त्यांनी कोंढवा येथे शाळा सुरू केली.

Late NCP leader and former Pune Zilla Parishad President Jalinder Kamte
Mumbai - Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

काँग्रेस पक्ष फुटून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पुणे जिल्ह्यात जालिंदर कामठे यांनी शरद पवार यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यावेळी शरद पवार यांच्या समर्थकांची पहिली बैठक जालिंदर कामटे यांच्या क्वीन्स गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याच्या आवारामध्ये झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com