IPS कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट

नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली
IPS कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट
IPS कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट- Milind Sangai
Published On

(मिलिंद संगई)

बारामती : नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. (IPS Officer Krushnaprakash Meeting with NCP Chief Sharad Pawar)

आज सकाळीच कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग येथे आले. त्यांनी पवार (Sharad Pawar) यांच्याशी दहा ते बारा मिनिटे संवाद साधला आणि तेथून ते निघून गेले. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. ही खाजगी भेट होती इतकेच त्यांनी या भेटीबाबत सांगितले.

IPS कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट
मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकावरील गोळीबाराचे धक्कादायक कारण समोर; ३ संशयितांना अटक

राज्यातील वरिष्ठ पोलिस (Police) अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यात कृष्णप्रकाश यांचाही नंबर लागल्यानंतरच या बाबत चर्चा सुरु झाली होती. पवार यांनाही कोल्हापूरला जाण्याची घाई होती, त्या मुळे त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला नाही. दरम्यान अंकुश शिंदे यांनी पदभारही स्विकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल याचीही चर्चा होती.

दुसरीकडे कृष्णप्रकाश यांना थांगपत्ता न लागू देता बदली केली गेल्याचीही जोरदार चर्चा आहे, कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते, असेही बोलले जात आहे. दरम्यान बदलीनंतर त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधत आज चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com