Pimpri Chinchwad firing: पुणे हादरलं! खासगी कंपनीत घुसून दोघांचा अंदाधुंद गोळीबार; CCTV व्हिडिओ आला समोर

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये दोन गुंडांनी दुचाकीवरून येत कंपनीजवळ अंदाधुंद गोळीबार केलाय. ही धक्कादायक घटना कैलास स्टील कंपनीमध्ये घडली असून, या अंदाधुंद गोळीबारात कंपनी सुपरवायझर गंभीर जखमी झालाय.
Pune Firing News
Pune Firing NewsSaam Tv News
Published On

पिंपरी चिंचवडमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडलीय. दोन गुंडांनी दुचाकीवरून येत कंपनीजवळ अंदाधुंद गोळीबार केलाय. ही धक्कादायक घटना वराळे परिसरातील कैलास स्टील कंपनीमध्ये घडली असून, या अंदाधुंद गोळीबारात कंपनी सुपरवायझर गंभीर जखमी झालाय. पोटात गोळी लागल्यानं सुपरवायझर गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. गावगुंडांनी हा गोळीबार कंपनी मालकाकडे खंडणी मागण्यासाठी आणि कामगारांना घाबरवण्यासाठी केली असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील महाळुंगे एमआयडीसीमध्ये कैलास स्टील कंपनीत २ हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. दोन आरोपी दुचाकीवरून आले. नंतर कैलास स्टील इंटरप्राईजेस या कंपनीत शिरले. दुचाकीवरून येताना त्यांनी बंदुक देखील सोबत ठेवली होती. दुचाकीवरून जात असताना, त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी २ राऊंड फायरिंग केले. या अंदाधुंद करण्यात आलेल्या गोळीबारात सुपरवायझर गंभीर जखमी झालाय.

Pune Firing News
SIP investment benefits: २००० रुपयांची SIP करा आणि करोडपती व्हा; जाणून घ्या श्रीमंतीचा फॉर्म्युला, फक्त एका क्लिकवर

सुपरवायझर याच्या पोटात गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी आहेत. हल्लेखोरांनी कंपनीत घुसून अचानक गोळबार केल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झालीय. तसेच कामगारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. गोळीबार झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढलाय.

Pune Firing News
Thane Borivali twin tunnel: वेळ वाचणार! ठाणे- बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा, प्रवास फक्त १५ मिनिटात

हा अंदाधुंद गोळीबार कंपनी मालकाकडे खंडणी मागण्यासाठी, तसेच कामगारांना घाबरण्यासाठी हल्लेखोरांनी केला असल्याची माहिती समोर आलीय. स्थानिक गावगुंडांनी हा गोळीबार केला असावा असा पोलीस विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी, पोलिसांनी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी कलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com